नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिक संघ सुपर लीगमध्ये पोहोचला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने एमसीए सिनियर इन्विटेशन लीग सध्या सुरू आहे. दोन दिवसीय कसोटी सामना प्रकारात नाशिक जिल्हा क्रिकेट संघाच्या खेळाडुंनी, औरंगाबाद व अहमदनगर येथे खेळताना लक्षणीय कामगिरी केली.
ब गटात समावेश असलेल्या नाशिक संघाने ५ साखळी सामन्यातील २ सामन्यांत – सी एम ए, पुणे व परभणी संघा विरुद्ध निर्णायक , तर अहमदनगर व नांदेड संघा विरुद्ध च्या २ सामन्यात, पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळविले . सांगली विरुद्ध नाशिक पराभूत झाला. या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर मात्र नाशिक जिल्हा क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन करीत पुन्हा मागे वळून पहिले नाही . असे ५ सामन्यांत २० गुण मिळवून नाशिक जिल्हा क्रिकेट संघाने , एकुण ६ गटातील ३६ संघांत विविध ठिकाणी खेळल्या गेलेल्या , वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग मध्ये प्रवेश केला.
एकूण पाच सामन्यात फलंदाजीत सलामीवीर यासर शेख व मधल्या फळीतील कुणाल कोठावदे या दोघांनीही १ नाबाद द्विशतक व १ शतक झळकवले . ७ डावांत यासरने ९० च्या सरासरीने ४५४, तर कुणालने ८२ च्या सरासरीने ४११ धावा केल्या. धनंजय ठाकुर ने ३ अर्धशतकांसह २५६ – सरासरी ६४. तर मुर्तुझा ट्रंकवाला ने ३ सामन्यातील ४ डावात एका अर्ध शतकासह १५३ धावा केल्या त्या सर्वाधिक १३९ च्या स्ट्राइक रेट ने. सिद्धार्थ नक्काने ही एका अर्ध शतकासह ४ डावात १२८ धावा केल्या.
गोलंदाजीत तन्मय शिरोडे ने आपल्या डावखुरा फिरकी ने अफलातून कामगिरी करतांना पाच सामन्यातील ८ डावात ३३ बळी घेतले. ते षटका मागे फक्त ३.२४ धावांच्या उत्कृष्ट सरसरीने सीएमए, पुणे संघाविरुद्ध च्या सामन्यात तन्मय ने तब्बल १३ बळी घेतले. ऑफ स्पिनर तेजस पवार ने ४ सामन्यातील ७ डावात १३ बळी घेत त्यास छान साथ दिली. मुर्तुझा ट्रंकवालाने अष्टपैलु चमक दाखविताना परभणी संघाविरुद्ध एका डावात ५ बळी घेतले व एकुण ३ सामन्यातील ३ डावात ९ बळी घेतले. जलदगती ऋतुराज ठाकरे ने ५ डावात ८ , यासर शेख ने ४ डावात ३ गडी बाद केले. संघाचे प्रशिक्षक शांताराम मेणे असून नाशिक जिल्हा क्रिकेट संघाला निवड समिती सदस्य सतीश गायकवाड व तरुण गुप्ता यांचे क्रिकेट ऑपरेशन कमिटीचे मुख्य राजेंद्र लेले यांचे मार्गदर्शन लाभले. या लक्षणीय कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खेळाडूंचे व संघाचे प्रशिक्षक शांताराम मेणे यांचे अभिनंदन केले आहे.