नाशकात रणजी सामन्याचा थरार…
बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल…
या संघांमध्ये रंगणार सामना…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, नाशिक येथे होत आहे. नाशिकमध्ये येत्या १ ते ४ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान होणाऱ्या या सामन्यासाठी बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ – क्यूरेटर – टी मोहनन यांनी भेट दिली.
रणजी सामन्यासाठी उत्कृष्ट खेळपट्टी तयार ठेवण्याच्या दृष्टीने सूचना केल्या व एकंदर तयारी बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत खेळपट्टीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शेखर घोष व पुण्याहून या सामन्यासाठी खास आलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निलेश गायकवाड व इतर एन डी सी ए चे ग्राउंडसमन देखील आहेत.
नाशिक मध्ये १ ते ४ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
मनपा आयुक्तांकडून पाहणी
या निमित्ताने नाशिक म न पा आयुक्त व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा मनिषा खत्री यांनी मैदानास खास प्रत्यक्ष भेट देऊन या सामन्याच्या तयारीचा आढावा घेतला. या प्रसंगी माननीय आयुक्तांनी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल, दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि रणजी ट्रॉफी सामन्यासाठी नाशिक म न पा चे संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.
याप्रसंगी त्यांनी बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ – क्यूरेटर – टी मोहनन यांची देखील विचारपूस केली.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा, सेक्रेटरी समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी डॉ अनिरुद्ध भांडारकर, हेतल पटेल, प्रवीण घुले, राजू आहेर, फय्याज गंजीफ्रॉक वाला ,शेखर घोष, रतन कुयटे , निखिल टिपरी आदि उपस्थित होते.








