इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीची निवडणूक ३ मे रोजी होत आहे. विद्यमान चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा यांच्या नेतृत्वाखालील, खेळाडू पॅनलचे एकूण सात पदाधिकारी – १ सेक्रेटरी, १ खजिनदार, २ जॉइंट सेक्रेटरी व ३ निवड समिति सदस्य असे याधीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता चेअरमन पदा करिता दोन – खेळाडू पॅनल व वैयक्तिक उमेदवार व कार्यकारिणी सदस्य १० पदांसाठी – खेळाडू पॅनलचे १० व वैयक्तिक ३ असे एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदान दिनांक ३ मे रोजी अन्नपूर्णा सभागृह ,नंदनवन लॉंन्स, मते नर्सरी रोड,सावरकर नगर, गंगापूर रोड , नाशिक येथे सकाळी ८.३० ते ५.०० वा. पर्यंत होईल. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे एकूण ३११२ आजीव सभासद व संलग्न एकूण ७६ क्लब सभासद आहेत.
ॲड. मनीष लोणारी आणि असोसिएट्स यांनी यंदाची निवडणूक मतदान यंत्राद्वारे होत असून सर्व तयारी पूर्ण झाल्याचे कळविले आहे.