इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामांकन पत्र वाटप, स्वीकृती व नामांकन अर्जाची छाननी प्रक्रिया, आज २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान झाली. उद्या २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल. आवश्यकता भासल्यास ३ मे रोजी मतदान होईल.
आज नामांकन पत्र वाटपाच्या दिवशी मुदत संपेपर्यंत एकूण २५ अर्ज प्राप्त झाले असून छाननी अंती त्यातील चेअरमन पदा करिता दोन व दोन जॉइंट सेक्रेटरी करिता ३ आणि दहा कार्यकारिणी सभासद पदांसाठी १५ नामांकन अर्ज प्राप्त झाले आहे.
सेक्रेटरी, खजिनदार व तीन निवड समिती सदस्य पदासाठी अनुक्रमे एक, एक व तीन अर्ज प्राप्त झाल्यामुळे
सेक्रेटरी : १) समीर अरुण रकटे.
खजिनदार : १) हेमंत दत्तात्रय देशपांडे.
निवड समिति सदस्य :
१) सतीश लक्ष्मण गायकवाड.
२) तरुण शिवशंकर गुप्ता.
३) फय्याज शब्बीर गंजीफ्रॉकवाला.
हे बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे असे निवडणूक अधिकारी ॲड मनीष लोणारी यांनी सांगितले.
चेअरमन पदा करिता –
१- धनपाल ( विनोद ) मोतीलाल शहा .
२- महेश झुंजार आव्हाड.
दोन जागा जॉइंट सेक्रेटरी करिता –
१- योगेश ( मुन्ना ) हिरे .
२- चंद्रशेखर दंदणे.
३- महेश देवबा भामरे.
आणि दहा कार्यकारिणी सभासद पदांसाठी पुढीलपप्रमाणे एकूण पंधरा जणांनी नामांकन पत्र भरले आहे . :
१- संदीप श्रीकिसन सेनभक्त.
२- महेश देवबा भामरे.
३ -महेन्द्र ( राजू ) कारभारी आहेर
४ -राघवेंद्र जयंतकुमार जोशी .
५ – हेतल खेमचंदभाई पटेल
६ – जगन्नाथ चंदु पिंपळे.
७ -शिवाजी भीमाजी उगले .
८-अनिरुद्ध विनायक भांडारकर .
९-निखिल रामनारायण टिपरी .
१०- विक्रांत प्रकाश मते.
११- बाळासाहेब उमाजी मंडलिक .
१२- नितीन सदाशिव धात्रक.
१३- कैलाश लक्ष्मीनारायण भुतडा
१४- ज्ञानेन्द्र सिंग सिसोदिया.
१५- अनिरुद्ध मुकुंद चिमठाणकर.
असे एकूण १५ अर्ज प्राप्त झाले आहे.
अर्ज सादर करतांना खेळाडू पॅनलचे ॲड विलास लोणारी, रणजी पटू रमेश वैद्य, चेअरमन पदाचे उमेदवार विनोद शहा, चंद्रशेखर दंदणे, शिवाजी उगले,योगेश (मुन्ना ) हिरे , हेतल पटेल हेमंत देशपांडे आदी उपस्थितीत होते. निवडणूक अधिकारी आहेत ॲड मनीष लोणारी आणि असोसिएट्स हे आहेत.