नाशिक – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित २०२१-२२ क्रिकेट हंगामातील कै. भाऊ मालुसरे ट्रॉफी ची अंतिम लढतीने सांगता झाली. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे खेळविण्यात आलेल्या , अंतिम मर्यादित २० षटकांच्या टी-ट्वेंटी सामन्यात नाशिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – ने मेरी क्रिकेट क्लब संघावर वर १०६ धावांनी मोठा विजय मिळविला.
संजय मालुसरे प्रायोजित कै. भाऊ मालुसरे ट्रॉफी स्पर्धेचे हे दहावे वर्ष. या कै. भाऊ मालुसरे ट्रॉफी स्पर्धेत एकूण ५२ सघांतील = अ तुकडीतील ४ गटातील, १६ सघांतील २३ साखळी व ब तुकडीतील ९ गटातील ३६ सघांतील ५५ साखळी – लीग = सामन्यांनंतर, आघाडीच्या ८ संघातील ४ उपान्त्यपूर्व व २ उपांत्य फेरीच्या सामन्यांनंतर सर्वोत्तम दोन संघात ही विजेतेपदाची लढत झाली. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नाशिक क्रिकेट अकादमी ने २० षटकांत ६ बाद २१६ धावा केल्या त्या कर्णधार अभिजीत पवार च्या ३२ चेंडूतील ६९ धावांमुळे.उत्तरदाखल नाशिक क्रिकेट अकादमी च्या लेग स्पिनर रविंद्र मच्छाने भेदक गोलंदाजी करीत ५ गडी टिपले व मेरी क्रिकेट क्लबला २० षटकांत ७ बाद ११० पर्यन्तच मजल मारुन दिली. अंतिम सामन्याच्या नाणेफेकीसाठी प्रयोजक संजय मालुसरे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव समीर रकटे उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक :
नाशिक क्रिकेट अकादमी २० षटकांत ७ बाद २१६
– अभिजीत पवार ६९, प्रमोद नारळे व रविंद्र मच्छा प्रत्येकी ३९. विशाल सानप व ऋषिकेश जाधव प्रत्येकी २ तर किरण मोराडे १ बळी.
विरुद्ध
मेरी क्रिकेट क्लब – २० षटकांत ७ बाद ११० – विशाल सानप २१. रविंद्र मच्छा ५ तर जयेश पवार व अक्षय घोरपडे प्रत्येकी १ बळी .
नाशिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – १०६ धावांनी विजयी .