शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

४५० फ्लॅट्स आणि १०० प्लॉटची स्पॉट बुकिंग… ६३७ कोटीहून अधिक उलाढाल… ५ दिवसीय गृह प्रदर्शन शेल्टरची सांगता

नोव्हेंबर 28, 2022 | 9:59 pm
in स्थानिक बातम्या
0
520

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे स्थान असून एकाच छताखाली विविध पर्याय देण्याचे काम क्रेडाई निरंतर करत आहे . नाशिकच्या ब्रँडिंग साठी देखील क्रेडाईने नेहमीच पुढाकार घेतला असून भविष्यात एज्युकेशन, मेडिको टुरिझम व अॅग्रो हब म्हणून शहराला पुढे नेण्यासाठी शहराची संस्कृती व पर्यावरण टिकविणे ही देखील आपणा सर्व नागरिकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले. त्या क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे येथील डोंगरे वस्तीगृह मैदानावर आयोजित शेल्टर 2022 या गृहप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

या 5 दिवसीय प्रदर्शन कालावधी मध्ये जवळपास 50000 नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली. तसेच 450 फ्लॅट्स आणि 100 प्लॉट ची नोंदणी केली. या प्रतिसादामुळे सुमारे नाशिक च्या बाजारात जवळपास ६३७ कोटीची उलाढाल झाली आहे. या प्रतिसादामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि व्यवसाय निर्मिती होणार असून येत्या काळात अनेकांना नाशिक मध्ये अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या समारोप प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. देवयानी फरांदे, आयजी (पोलीस) बी जी शेखर, राष्ट्रीय क्रेडाई चे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाई च्या घटना समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील, क्रेडाई महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद खैरनार, शेल्टरचे प्रायोजक ललित रुंग्टा व दिपक चंदे हे मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ पवार पुढे म्हणाल्या की, भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी सर्वांनी निरोगी राहणे आवश्यक आहे त्यासाठी बांधाकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतींमध्ये जिम, जॉगिंग ट्रक सारख्या सोयी पण द्याव्यात अशी अपेक्षा हि त्यांनी व्यक्त केली. निर्माणाधीन चेन्नई – सुरत महामार्ग तसेच निफाड मधील प्रस्तावित मल्टी लॉजीस्टिक पार्क यामुळे देखील नाशिक मध्ये अनेक नव्या संधी येतील असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, नाशिक हि पवित्र भूमी असून हवामान, आरोग्य, चांगले अन्न, मुबलक पाणी हि आपल्याला मिळालेली दैवी देणगी आहे. यामुळेच नाशिकमध्ये आपले घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. नाशिक मध्ये तुलनात्मक दृष्ट्या दर कमी असून मनुष्यबळ प्रशिक्षणामध्येहि क्रेडाई ने महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपल्या मनोगतात आ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, नाशिकची स्कायलाईन बदलत असून बहुमजली इमारतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ – मराठवाडा पण जवळ येणार असून तेथील ग्राहक पण नाशिकला निश्चित येणार आहे. नाशिक – मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण करून हा रस्ता देखील मोठा होणार असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हाच मार्ग समृद्धी महामार्गाला जोडल्यानंतर नाशिकहून मुंबई व नागपूर येथे त्वरीत पोहचता येईल. रेरा कायदा आणि युनिफाईड डिसीपीआर मुळे बांधकाम बांधकाम क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, यावेळेस शेल्टर मध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्व स्टॉल चे बुकिंग देखील सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाले होते. प्रदर्शनामध्ये सहभागी विकसकांनी भविष्यातील नाशिक कसे असेल याची झलकच दाखविली. उंच इमारती, .मोठ्या शहरांसारख्या टाऊनशिप तसेच अल्ट्रा लक्झरीअस अपार्टमेंटला पसंत केले गेले. मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेत नाशिक येथील रियल इस्टेट चे दर तुलनात्मक दृष्ट्या खूपच कमी व सामान्यांच्या आवाक्यात असल्याने आज नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये निश्चितच फायदेशीर ठरेल असेही ते म्हणाले. शेल्टर चे यश हे टीम वर्क असून यावेळेस बुकींगचे प्रमाण पण चांगले आहे. भविष्यात यापेक्षा पण मोठे प्रदर्शन क्रेडाई तर्फे आयोजित करण्यात येईल.

शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील यांनी सांगितले की, क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर प्रदर्शननाने अनेक नवे उच्चांक प्रस्थापित केले असून नाशिक ब्रॅण्डिंग करिता क्रेडाई ने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे असे यामुळे म्हणता येईल . अतिभव्य आंतर राष्ट्रीय स्तरास साजेसे असे नीटनेटके आयोजन , आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल , पार्किंग ची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्स ची रेलचेल या मुळे राज्यातील हे गृह प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले.

आ. रोहित पवार यांची प्रदर्शनास भेट –
आपल्या पूर्व नियोजित कार्यक्रमातून वेळात वेळ काढून कर्जत जामखेड चे आ. रोहितदादा पवार यांनी प्रदर्शनास भेट दिली. अनेक स्टोल मध्ये जाऊन त्यांनी बदलते नाशिक चे चित्र प्रत्यक्षात बघितले. याप्रसंगी डॉ उमेश काळे, डॉ प्रशांत खैरे तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन, शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत

लकी ड्रॉ द्वारे निवडलेले चौथ्या दिवसातील भाग्यवंत असे –
1) केतन त्रिवेदी
2) संदीप येवला
3) शरद
4) महेश सोनवणे
5) असिफ शेख

Nashik Credai Shelter Expo 637 Crore Turnover
Property Real Estate Building

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज मिळेल गुंतवणूक शुभवार्ता; जाणून घ्या, मंगळवार २९ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

राज्यपाल कोश्यारींविरोधात ‘स्वराज्य’ संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कार्यालयासमोर घोषणाबाजी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20221128 WA0298 1 e1669658893860

राज्यपाल कोश्यारींविरोधात 'स्वराज्य' संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कार्यालयासमोर घोषणाबाजी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011