नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शनिवार आणि रविवार सुट्टीचा मुहूर्त साधून गृह शोधाची मोहीम पूर्ण करण्यास सोयीचे व्हावे यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर हे गृहप्रदर्शन यावेळी ५ दिवसांचे असून २४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या प्रदर्शनाची सांगता सोमवार दिनांक २८ रोजी रात्री ८ वाजता होणार आहे. अतिभव्य आंतर राष्ट्रीय स्तरास साजेसे असे नीटनेटके आयोजन , आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल , पार्किंग ची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्स ची रेलचेल या मुळे या वेळेस चे शेल्टर आगळे वेगळे ठरत असून चार दिवसात सुमारे ४०००० नागरिकांनी शेल्टर ला भेट दिली असून २५० हून अधिक सदनिकांचे बुकिंग झाले आहे. कोणत्याही शहराच्या निर्मिती मध्ये तेथील बांधकाम व्यवसायिक यांची भूमिका मोलाची असते . नाशिक शहराचे लँडस्केप , ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग या मध्ये ३५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या क्रेडाई ची भूमिका महत्त्वपूर्ण आहे .
क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा ‘नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात 100 हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था एकाच छताखाली आहेत . अगदी ९ लाख रुपये किमतीच्या प्लॉट पासून ५ कोटी रुपयांच्या फ्लॅट्स येथे उपलब्ध आहेत .मोठ्या शहरांसारख्या टाऊनशिप ची सुरुवात नाशिक मध्ये काही वर्षांपूर्वी झाली .अश्यांप्रकरच्या टाऊनशिप ला अनेक कारणांमुळे देखील ग्राहकांची पसंती मिळत आहे. मुंबई आणि पुणे यांच्या तुलनेत येथील रियल इस्टेट चे दर तुलनात्मक दृष्ट्या खूपच कमी असल्याने आज नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये निश्चितच फायदेशीर ठरेल .
शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील म्हणाले की, नियमात झालेल्या अनेक बदलांमुळे आज नाशिक मध्ये सुमारे ३० ते ३५ मजले इमारतीचे निर्माण होत असल्याने शहराची स्काय लाईन बदलत आहे. कधीकाळी एक अथवा दोन मजली टुमदार घराचे शहर आता उंच इमारतींचे शहर होत आहे. नाशिक मध्ये सर्वांनी पर्यावरणाशी समतोल राखून असा संतुलित विकास करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नाशिक मध्ये रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीस अनेक जण उत्सुक आहेत . त्यातच नाशिकमध्ये येऊ घातलेल्या अनेक नव्या व्यवसाय आणि उद्योगाच्या संधींमुळे नाशिकचे भविष्यातील चित्र खूप आश्वासक असून आज रिअल ईस्टेट क्षेत्रात नाशिक मधील गुंतवणूक निश्चितच फलदायी ठरणार आहे.
समारोप कार्यक्रम
दिनांक २८ रोजी संध्याकाळी होणाऱ्या समारोप कार्यक्रमासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, आ. सरोज आहिरे, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., मनपा आयुक्त डॉ सि एल. पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे हे मान्यवर देखील उपस्थित राहतील
शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत.
लकी ड्रॉ द्वारे निवडलेले तिसऱ्या दिवसातील भाग्यवंत असे –
1.किरण पिंगळे
2. दिपक सूर्यवंशी
3.अभय काळे
4.अभिजीत अटल
5.अजित शिर्के
Nashik Credai Shelter Exhibition Last Day Today
Home House Real Estate