नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रगतीशील नाशिक मध्ये उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे आयोजित गृह प्रदर्शन शेल्टर २०२२ चा उद्या दिनांक २४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते शुभारंभ होत असून या कार्यक्रमास पालकमंत्री दादासाहेब भूसे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, आ. सरोज आहिरे, आ. राहुल ढिकले हे मान्यवर देखील उपस्थित राहतील अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन गंगापूर रोड वरील डोंगरे वस्तीगृह मैदान येथे 28 नोव्हे पर्यंत चालेल.
’ विचार समृद्धीचा .. पत्ता नाशिकचा’ नाशिक नेक्स्ट’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात भविष्यातील नाशिक ची झलक बघावयास मिळणार असून भविष्यात नाशिक मध्ये येऊ घातलेल्या अनेक नवीन योजना आणि प्रकल्पामुळे नाशिक मध्ये आज रियल इस्टेट मध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात नक्की फायदेशीर ठरणार आहे., नाशिकला दक्षिणेशी जोडण्यासाठी आणि गुजरातचे महत्वपूर्ण शहर सुरतशी नाशिकची जवळीक निर्माण करण्यासाठी महत्व पूर्ण अश्या , निर्माणाधीन चेन्नई-सुरत एक्स्प्रेस वे , दिंडोरी औद्योगिक वसाहतीमध्ये लवकरच येत असलेला 3500 कोटींचा रिलायन्स लाइफ सायन्स प्रकल्प, इंडिअन ओईल प्रकल्प, नाशिक मध्ये विस्तार करणारे देशातील अनेक नवे हॉस्पिटल्स , शैक्षणिक संस्था , हॉटेल्स या मुळे रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या अनेक संधी शहरात निर्माण होत आहेत . असेही रवी महाजन यांनी नमूद केले.
नाशिक जवळील शहरे मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिक मध्ये असलेल्या संधी आणि तुलनेने कमी दर यामुळे नाशिक मध्ये रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सध्या एकदम योग्य वेळ असून शेल्टर प्रदर्शनामुळे ही एक नामी संधी उपलब्ध आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या प्रसंगी बोलताना शेल्टर चे समन्वयक कृणाल पाटील म्हणाले की महाराष्ट्राच्या गृह प्रदर्शनाच्या इतिहासत शेल्टर २०२२ हे प्रदर्शन सर्वात भव्य म्हणून ओळखले जाईल या मध्ये 100 हून अधिक बिल्डर यांचे ५०० हून अधिक प्रकल्प, बांधकाम साहित्य , इंटेरिअर तसेच इतर संबंधित व्यवसाय , आघाडीच्या गृह कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांसह एकाच छताखाली असतील.
प्रदर्शनात ग्राहकांसाठी बजेट प्रॉपर्टी ते अगदी पॉश अपस्केल डायनॅमिक लक्झरी प्रकल्प , प्लॉट , फार्म हाउस , व्यवसायिक , शोप्स याचे देखील असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. हे पर्याय नाशिकसहित सिन्नर, दिंडोरी, धुळे, जळगाव, मालेगाव, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या विविध लोकेशन मध्ये आहेत.. प्रदर्शनाच्या विशेषता बाबत अधिक माहिती देतांना कृणाल पाटील, म्हणाले की शेल्टर पसरले असून हे पूर्णपणे आहे.
शेल्टर २०२२ वैशिष्ठ्ये
१. दीड लाख चौरस फूट एवढ्या विस्तीर्ण जागेत जागतिक दर्जाच्या सुविधा
२. पेपरलेस
३ .भव्य आणि चविष्ट फूड साठी कॅफेतेरीया
४. नाशिक मधील सर्वप्रथम लेगसी वाल
५. प्रदर्शनास भेट देणार्यामधून दहा लकी ड्रो विजेता आणि एक बम्पर बक्षिस
७. लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि फन झोन
८. रोज हैप्पी स्ट्रीट मध्ये स्थानिक कलाकारंसह संगीत आणि फन फेअर
नाशिक- इमर्जिंग एजुकेशन हब ऑफ इंडिया सर्वे चे प्रकाशन
आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था जेएलएल आणि क्रेडाई नाशिक मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने देशपातळीवर करण्यात आलेल्या सर्वे रिपोर्ट चे विमोचन देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमात होणार आहे. शेल्टर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर , राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख [ घटना ] जितुभाई ठक्कर , महाराष्ट्र क्रेडाई चे सचिव सुनील कोतवाल तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण , सुरेश पाटील , नेमीचंद पोतदार , उमेश वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभत असून क्रेडाई नाशिक मेट्रो चे मानद सचिव गौरव ठक्कर , कोषाध्यक्ष हितेश पोतदार , सहसचिव अनिल आहेर, सहसचिव सचिन बागड तसेच कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी , नितीन पाटील, मनोज खिवंसरा , अंजन भालोदिया, अतुल शिंदे, सुशील बागड, राजेश आहेर, हर्षल देशमुख, श्रेणिक सुराणा, नरेंद्र कुलकणी, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके हे कार्यरत आहेत.
Nashik Credai Real Estate Shelter Expo 2022