नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भव्य वातानुकुलीत डोम्स, ७० हून अधिक विकसकांचे सुसज्ज आणि विविध संकल्पनेने सजलेले प्रशस्त स्टॉल्स सोबतच घरे, दुकाने, फार्महाऊस आणि प्लॉट विकत घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता व त्यासाठी केलेली त्वरित साईट व्हिजीट आणि नंतर त्वरित निर्णय असेच काहीसे चित्र क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये दिसत आहे.
१४ एप्रिल पासून सुरु झालेल्या या प्रदर्शनाचा १७ एप्रिल रोजी समारोप होणार असून पहिल्या तीन दिवसांत सुमारे ३०० सदनिकांचे बुकिंग तसेच १००० हून अधिक साईट व्हिजीट झाल्या आहेत. प्रदर्शनात बघितलेल्या प्रॉपर्टीचे व्यवहार येत्या ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होतात असा अनुभव आहे. त्यामुळे येत्या काही काळात नाशिक च्या रिअल इस्टेट क्षेत्राला ला पुन्हा उभारी मिळेल . या मिळालेल्या प्रतिसादामुळे शहरामध्ये घर घेण्याची सकारात्मक मानसिकता तयार होईल असा आशावाद क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये येऊ घातलेल्या अनेक योजनांमुळे शहराचे चित्र येत्या काळात बदलणार असून घर घेण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी हीच ती वेळ हे असंख्य ग्राहकांनी देखील मान्य केले असल्याचेही ते म्हणाले.
प्रॉपर्टी एक्स्पोचे समन्वयक अनिल आहेर म्हणाले की, जसे या प्रदर्शनाची घोषणा झाली तसे यास विकसकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद हा ग्राहकांकडून देखील मिळत आहे.क्रेडाई चे सदस्य असलेल्या सर्व विकसकांनी सचोटी द्वारे ग्राहकांचा विश्वास जिंकला असून ग्राहकाभिमुख व्यवहार, कायद्याचे तंतोतंत पालन यामुळे देशभरात क्रेडाई नाशिक मेट्रोने चांगले नाव कमावले असून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे नाशिक ब्रान्डींग साठी केलेय विविध उपक्रमांमुळे प्रदर्शनास नाशिक बाहेरील विविध शहरातून नागरिक भेट देण्यास येत आहेत . प्रदर्शनात झालेल्या उलाढालीचा फायदा हा शहरातील अनेक घटकांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रदर्शनासाठी विकसकांनी अनेक आकर्षक योजना जसे स्पिन ४ व्हील, कॅशबॅक ऑफर दिल्या असून वित्तीय संस्थांनी देखील आकर्षक व्याजदर दिले असून बजेट होम पासून अगदी प्रिमियम घरांना देखील उत्तम मागणी आहे . करोना नंतर मोठ्या घराकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे माहिती प्रदर्शनाचे सहसमन्वयक मनोज खिंवसरा यांनी दिली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सदस्य विशेष सहकार्य करत आहेत.