नाशिक – शहरात आता कोविशिल्ड, कोवॅक्सिननंतर आता स्पुतनिक ही लसही उपलब्ध होणार आहे. तसेच, या तिन्ही लस खासगी हॉस्पिटलमध्ये कुठल्या दराने उपलब्ध होतील हे महापालिकेने जाहिर केले आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक शहरातील नागरिकांमध्ये स्पुतनिक या लसी संदर्भात आकर्षण वाटू लागले होते. आता त्या नागरिकांची प्रतीक्षा संपलेली आहे. शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये आता स्पुतनिक लस आणि भारतीय बनावटीच्या दोन्ही लस मिळणार आहेत.
कोविशील्ड,कोव्हॅक्सिन या दोन भारतीय बनावटीच्या तर रशियातील स्पुतनिक या प्रकारच्या लस आता नाशिक मध्ये हि उपलब्ध झाली आहे. खाजगी हॉस्पिटल मध्ये लसीचे शुल्क आकारून ही लस दिली जात आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मनपाने म्हटले आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरामध्ये नऊ खाजगी हॉस्पिटल मध्ये लसीकरण चालू आहे. ज्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे. तरी त्यांनी खाली दिलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेऊ शकतात. यासोबतच महापालिकेच्या सर्व केंद्रांवर सर्वांसाठी मोफत लसीकरण हे चालूच आहे. त्यांची माहितीही वेळोवेळी सामाजिक माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. सध्या नाशिक शहरात खाजगी रुग्णालयांमध्ये कुठे कुठे लसीकरण सुरु आहे याबाबत वारंवार नागरिकांकडून विचारणा होत होती. त्या अनुषंगाने हे प्रसारित करण्यात येत आहे.
खासगी हॉस्पिटल, लसीचा प्रकार आणि दर असे