नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. या लसीकरण मोहिमेबाबत नाशिक महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिशन झिरो व मिशन लसीकरण अतंर्गत नाशिक महानगरपालिका,भारतीय जैन संघटना,वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात अँटीजेन टेस्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे ३१ लसीकरण केंद्र सुरु आहे. त्याठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची अँटीजेन टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणी नागरिक त्याठिकाणी सुपर स्प्रेडर असल्यास कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. तरी नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्रावर आल्यास त्यांनी अँटीजेन टेस्ट करून लस घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महापालिका प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.