नाशिक – शहरात उद्या (बुधवार, ४ ऑगस्ट) कोरोना प्रतिबंधक लस कुठल्या केंद्रांवर लस मिळणार हे महापालिकेे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, बुधवारी केवळ कोवॅक्सिन हीच लस उपलब्ध राहणार आहे. ही लस इंदिरा गांधी हॉस्पिटल (पंचवटी), समाज कल्याण विभाग (नासर्डी पूल) आणि जेडीसी बिटको हॉस्पिटल (नाशिकरोड) या तीन केंद्रांवरच मिळणार आहे. मात्र, कोविशिल्ड ही लस उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे नाशिककरांना उद्या गैरसौयीचा सामना करावा लागणार आहे.