नाशिक – कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नाशिकररांची सुरू असलेली वणवण अद्यापही कमी होत नसल्याचे चित्र आहे. कोविशिल्ड या लसीची अनुपलब्धता हे मोठे कारण आहे. आठवड्यातील केवळ १ किंवा २ दिवसच कोविशिल्ड लस उपलब्ध होत आहे. उर्वरीत दिवस केवळ कोवॅक्सिन ही लस उपलब्ध होत आहे. त्यातही कोवॅक्सिन ही लस अवघ्या २ ते ३ केंद्रांवरच मिळत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची त्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. खासकरुन दुसरा डोस असलेल्यांना तर कुठलाही पर्याय नसल्याने त्यांची चांगलीच फरफट होत आहे. उद्या (शुक्रवार, २० ऑगस्ट) शहरात कुठल्या केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध असेल हे नाशिक महापालिकेने सांगितले आहे. तर, कोविशिल्ड ही लस उपलब्ध राहणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.