नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना संसर्गाची स्थिती केवळ मुंबई आणि पुण्यातच चिंताजनक नाही तर ती नाशकातही आहे. गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल चौपट झाली आहे. सद्यस्थितीत १ हजार ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या परिस्थितीची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३२, बागलाण ०९, चांदवड ०५, देवळा ११, दिंडोरी ५३, इगतपुरी ०९, कळवण ००, मालेगाव ०५, नांदगाव ०७, निफाड ५०, पेठ ००, सिन्नर २१, सुरगाणा ०२, त्र्यंबकेश्वर ०५, येवला ०६ असे एकूण २१५ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १० तर जिल्ह्याबाहेरील ३४ रुग्ण असून असे एकूण १ हजार ०४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १४ हजार ७५५ रुग्ण आढळून आले आहेत.
बघा जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/455385342746047/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C
ग्रामीणमध्ये आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०१, बागलाण ००, चांदवड ०२, देवळा ०५, दिंडोरी ०३, इगतपुरी ०१, कळवण ०४, मालेगाव ०१, नांदगाव ०१, निफाड १२, पेठ ००, सिन्नर ०२, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०० असे एकूण ३२ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१८ टक्के, नाशिक शहरात ९८.९४ टक्के, मालेगाव मध्ये ९७.११ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ६४ इतके आहे.
मृत्यू
नाशिक ग्रामीण ४ हजार २४८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार २७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७५८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ४ लाख १४ हजार ७५५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ४ हजार ९५३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ४३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)