नाशिक – दर आठवड्याप्रमाणे यंदाही पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक संपन्न झाली. नाशिक शहरासह जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचे ३० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध शिथील केल्यानंतर हे रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आढावा बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पालकमंत्री म्हणाले की,
– सॅम्पल तपासणीनंतरचे अहवाल एक ते दोन महिन्यांनी आले. डेल्टा व्हेरिएंटची माहिती त्यातून कळाली आहे. आढळलेले ३० रुग्णांची माहिती घेतली जात आहे. यातील बरेच रुग्ण बरे झाले आहेत. या व्यक्ती किती जणांच्या संपर्का आल्या ती माहिती घेतली जात आहे.
– कोरोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल
– लगतच्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याचाही परिणाम आपल्या जिल्ह्यावर होतो आहे.
– कोरोनाच्या रोजच्या बाधितांची संख्या एक हजारापेक्षा कमी होत नाही, ते कसे होईल यावर काम केले जाईल
– बोट क्लब सुरू करण्याची मागणी होती. ५० टक्के क्षमतेने बोट क्लब सुरू होईल. जॅकेट सॅनिटाईज करा, प्रत्येकाची तपासणी करा, मास्क सक्तीचे असेल या अटींसह बोट क्लब सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ऑनलाईन बुकींग करुन वेळा देण्याचेही सांगण्यात आले आहे.
– कोरोना लसीकरण सुरू आहे. १४ लाख जणांनी (२० टक्के) पहिला डोस घेतला आहे. तर ७ टक्के जणांनी २ डोस घेतले आहेत. एकूण २७ टक्के लसीकरण नाशिकमध्ये झाले आहे.
– रॅन्डम सॅम्पलिंग, रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
– कोरोनाचे नियम सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा बाधितांची संख्या वाढेल
– ऑक्सिजन उपलब्धतेबाबतची योग्य ती कार्यवाही सुरू आहे. विविध प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत
– मॉल, शाळा, दुकाने सुरू झाले आहेत. शनिवारची मुभा दिली आहे.
– हॉटेल व रेस्टॉरंट बाबत राज्य सरकार निर्देश देईल तशी परवानगी दिली जाईल
– सध्याच्या नियमांमध्ये कुठलेही बदल आजपासून करण्याचे निश्चित नाही. जे नियम लागू आहे तेच राहतील.
– अनेक जण आजही मास्क घालताना दिसत नाहीत. माझी हात जोडून विनंती आहे, असे करु नका. स्वतःसह दुसऱ्याचीही काळजी करण्याची वेळ आता आहे.
– शाळा सुरू करण्याची संस्थाचालकांची तयारी आहे. याबाबत राज्य शिक्षण विभाग आदेश काढेल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल
– डेल्टा व्हेरिएंट – नाशिकलाच याची चाचणी होईल किंवा करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कारण, अहवाल येण्याचा कालावधी मोठा आहे.
– नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मास्क जरी सक्तीने वापरला तरी फरक पडेल.