विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांचा फैसला उद्या शनिवारी (१२ जून) होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंधांबात पाच स्तरीय नियमावली जाहिर केली आहे. गेल्या आठवड्यात नाशिकमधील कोरोना निर्बंधांचा आढावा घेतल्यानंतर नाशिक शहर हे दुसऱ्या तर जिल्हा (ग्रामीण) हे तिसऱ्या स्तरात येत असल्याचे दिसून आले. परिणामी, नाशिक शहरासह जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील नियम लागू करण्यात आले. मात्र, गेल्या आठवड्याभरात नाशिकमधील कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढला असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत नाशिकचा कोरोना पॉझिटिव्ह रेट हा ७.१२ टक्के झाला आहे. त्यामुळे नाशिकचा समावेश हा चौथ्या स्तरात होणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये देण्यात आलेली शिथीलता काहीशी कमी होण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच, नाशिकमध्ये कोरोना निर्बंधात वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पालकमंत्री भुजबळ हे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत.
नाशिकमधील कोरोनाची आजची स्थिती
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली आकडेवारी