नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आता ही संख्या चौपट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि कोरोना निर्बंधांचे पालन व्हावे यासाठी विविध अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बघा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे
\