विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहरासह जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत नक्की काय सुरू असेल आणि काय बंद असेल यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. दर शुक्रवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कुठल्याही परिस्थितीत १० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
१ जून ते १५ जून या कालावधीतील कोरोना निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश काढले आहेत. या आदेशात “सुरू करण्यासाठी पात्र” ज्या ज्या बाबींचा नव्याने स्पष्ट उल्लेख केला आहे केवळ त्याच बाबी नव्याने सुरू करता येतील. ज्या बाबी प्रतिबंधित केल्या आहेत त्या प्रतिबंधित राहतील. ज्या बाबींचा स्पष्ट उल्लेख या आदेशात नाही त्यासाठी यापूर्वी पारित केलेल्या आदेशातील निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हे आदेश असे