विशेष प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता येत्या १५ जूनपर्यंत कोरोना निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे कोरोना निर्बंध शिथील करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार नाशिकचा हा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय उद्या (३१ मे) सायंकाळपर्यंत जाहिर केला जाणार आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेय
—