विशेष प्रतनिधी, नाशिक
नाशिककरांनी दिलेल्या भरघोस साथीमुळे नाशिकमध्ये कोरोना विरोधी लढ्याला चांगले यश येताना दिसत आहे. सध्या शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह सर्व प्रकारचे व्यवहार सध्या बंद आहेत. सक्रीय रुग्णांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तसेच, जवळपास सर्वच हॉस्पिटलमध्ये सध्या ५० टक्के बेड रिकामे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
गेल्या २५ एप्रिल रोजी सक्रीय रुग्णांची संख्या ४८ हजारांपेक्षा अधिक होती. तीच आज १८ हजारांवर आली आहे.
८ एप्रिल रोजी दिवसभरातील बाधितांची संख्या साडेसहा हजार होती. तीच आता १ हजारावर आली आहे.
एप्रिल महिन्यात ४५ पेक्षा अधिक मृत्यू होत होते. तेच आता ३०च्या आसपास आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचा दर हा ८ एप्रिल रोजी ४१.५२ टक्के होता तो आता ८.२० टक्के झाला आहे.
कंटेनमेंट झोनची संख्या १ मे रोजी ९ हजार ३०१ होती ती आता ४ हजार ७६४ एवढी झाली आहे.
ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात घटली आहे