इंडिया दर्पण विशेष लेखमाला
गोदाकाठचं वैभव
नासिक नगरपालिकेचा जन्म
१५५ वर्षांपूर्वी १ मे १८६८ रोजी सकाळी ८ वाजता नासिक नगरपालिकेच्या जन्म झाला. नासिक नगरपालिकेच्या पूर्वारंभ सोबतच्या फोटोतील ह्याच राजेबहाद्दूर वाड्यात गेला. त्याकाळी नाशिक शहराची लोकसंख्या शिरगणतीनुसार २२ हजारच्या आसपास होती. सन १९३७ ला नगरपालिकेच्या टेलिफोन नंबर ३१९ होता.
कै. शंकर मोरो रानडे यांनी नाशिक नगरपालिकेवर केलेली काव्यपंक्ती…
नगर छबेली म्युनिसिपालिटी वंदन करितो तुला|
कलेक्टर मुख्य पती तुज भला ||
दिवाबत्ती सोय:-
पूर्वी नाशकात फक्त १२ कंदील होते. नंतर केरोसीन तेलाचे दिवे शहरात लावावेत असे म्युस्निपल कमिटीने ठरवल्यानुसार उत्तम प्रकारचे कंदील मुंबईहून आणावे लागले. ४ नोकरा द्वारे सबंध शहरभर १३८५ केरोसीनचे कंदील अंधराशी झुंज देत प्रकाश फैलावाच्याचे काम करीत होते.
सन १९४०च्या दरम्यानचे नाशिक म्युन्सिपाल्टीचे टोल नाके
देवळाली (नाशिक बाजू) चार (४) आणा टेक्स, चोर गल्ली (शिंगणे गल्ली), मुंबई नाका (शिवाजी गार्डन) नासर्डी, त्रंबक दरवाजा, मल्हार दरवाजा, टाळकुट्या, टाकळी, गोदावरी नदी, रेल्वे तिकीट ऑफिस, डांगर उतारा, पेंट रोड, भडक दरवाजा, जानोरी रोड आणि कट्या मारुती
Nashik Corporation Establishment History by Devang Jani