*पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*
*उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ८९५ ने घट*
*जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ९४ हजार १४६ रुग्ण कोरोनामुक्त*
*सद्यस्थितीत ३६ हजार ०११ रुग्णांवर उपचार सुरू*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ९४ हजार १४६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३६ हजार ०११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ८९५ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ७८९, चांदवड १ हजार २०, सिन्नर २ हजार १२५, दिंडोरी १ हजार ८०, निफाड २ हजार ३८५, देवळा १ हजार १५, नांदगांव ५४९, येवला ६६६, त्र्यंबकेश्वर २७८, सुरगाणा ४४६, पेठ १४७, कळवण ६६६, बागलाण १ हजार ३४७, इगतपुरी ४०२, मालेगांव ग्रामीण ८०६ असे एकूण १५ हजार ७२१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १८ हजार ४१८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६१७ तर जिल्ह्याबाहेरील २५५ असे एकूण ३६ हजार ०११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार ७५७ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.४६ टक्के, नाशिक शहरात ८९.९० टक्के, मालेगाव मध्ये ८३.८७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.३० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८८.१३ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार ६८१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५२ व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ६०० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️३ लाख ३३ हजार ७५७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ९४ हजार १४६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३६ हजार ०११ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८८.१३ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)