पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*
*उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २ हजार २६७ ने घट*
*जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ७४ हजार ४१५ रुग्ण कोरोनामुक्त*
*सद्यस्थितीत ४२ हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरू*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार ४१५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४२ हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २ हजार २६७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ४५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १४३, चांदवड १ हजार ३००, सिन्नर १ हजार ७६४, दिंडोरी १ हजार ४१३, निफाड २ हजार ८८०, देवळा १ हजार १७५, नांदगांव ८७१, येवला ६२१, त्र्यंबकेश्वर ४८७, सुरगाणा ४३६, पेठ १६९, कळवण ८१३, बागलाण १ हजार ५५१, इगतपुरी ३५६, मालेगांव ग्रामीण ८८० असे एकूण १६ हजार ८५९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २३ हजार ४४४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७०७ तर जिल्ह्याबाहेरील ३०२ असे एकूण ४२ हजार ३१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख २० हजार १८५ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८३.७४ टक्के, नाशिक शहरात ८६.९२ टक्के, मालेगाव मध्ये ८२.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.८९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार ५९७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५१९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २४४ व जिल्हा बाहेरील ९७ अशा एकूण ३ हजार ४५७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️३ लाख २० हजार १८५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ७४ हजार ४१५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४२ हजार ३१३ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे