*पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*
*उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार १८० ने घट*
*जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ९० हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त*
*सद्यस्थितीत ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरू*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ५६३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार १८० ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६४२, चांदवड ९८०, सिन्नर २ हजार २४७, दिंडोरी १ हजार ९३, निफाड २ हजार ३५६, देवळा ९५७, नांदगांव ५०४, येवला ७१०, त्र्यंबकेश्वर ३२७, सुरगाणा ४९०, पेठ १३७, कळवण ६२४, बागलाण १ हजार २९७, इगतपुरी ३७९, मालेगांव ग्रामीण ८३८ असे एकूण १५ हजार ५८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९ हजार ३५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७०७ तर जिल्ह्याबाहेरील २६२ असे एकूण ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ३७ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.४२ टक्के, नाशिक शहरात ८९.३७ टक्के, मालेगाव मध्ये ८२.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.०९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.७७ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार ६५६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५६२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५२ व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️३ लाख ३१ हजार ३७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ९० हजार ५६३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३६ हजार ९०६ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.७७ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)