कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख १६ हजार ०१९ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३३ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ११ हजार ९५० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३४ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ३१५ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ८२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ४७४, चांदवड १ हजार ३४, सिन्नर १ हजार ९८८, दिंडोरी १ हजार ४४३, निफाड २ हजार ३६८, देवळा १ हजार २३, नांदगांव ५९५, येवला ४४६, त्र्यंबकेश्वर ३३६, सुरगाणा ४९०, पेठ ११०, कळवण ७६२, बागलाण १ हजार २३१, इगतपुरी ४१४, मालेगांव ग्रामीण ९१९ असे एकूण १५ हजार ६३३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १५ हजार ७६४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५२२ तर जिल्ह्याबाहेरील ३१९ असे एकूण ३२ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ०८२ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८६.४३ टक्के, नाशिक शहरात ९१.६२ टक्के, मालेगाव मध्ये ८४.८१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.५८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.५० इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ८०४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६४९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २७३ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ३ हजार ८२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ५३ हजार ०८२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख १६ हजार १९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३३ हजार २३८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.५० टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*