कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ६१ हजार ४८२ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू
विशेष प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ४८२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार ३४६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ३८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६६६, चांदवड १ हजार ६१२, सिन्नर २ हजार १२, दिंडोरी १ हजार ३८३, निफाड ३ हजार ६१८, देवळा १ हजार २७३, नांदगांव ८९९, येवला ७७३, त्र्यंबकेश्वर ३९८, सुरगाणा ३५९, पेठ २००, कळवण ७८०, बागलाण १ हजार ६५४, इगतपुरी ३६८, मालेगांव ग्रामीण ८२१ असे एकूण १७ हजार ८१६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २६ हजार ६८५ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७२६ तर जिल्ह्याबाहेरील २४७ असे एकूण ४६ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ३३८ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८२.३३ टक्के, नाशिक शहरात ८४.८७ टक्के, मालेगाव मध्ये ८२.४७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.८५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.९९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ५४४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५०४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३७ व जिल्हा बाहेरील ९७ अशा एकूण ३ हजार ३८२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ११ हजार ३३८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ६१ हजार ४८२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४६ हजार ४७४ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.९९ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)