*पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*
*जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ५२ हजार ११२ रुग्ण कोरोनामुक्त*
*सद्यस्थितीत ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार ११२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार ३११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६९०, चांदवड १ हजार ८३२, सिन्नर २ हजार ९१, दिंडोरी १ हजार ५२२, निफाड ३ हजार ७७८, देवळा १ हजार २१७, नांदगांव ९३१, येवला ७९०, त्र्यंबकेश्वर ५०९, सुरगाणा ३७७, पेठ १६८, कळवण ८९७, बागलाण १ हजार ५९८, इगतपुरी ४६८, मालेगांव ग्रामीण ७८७ असे एकूण १८ हजार ६५५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७ हजार ७९७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३६ तर जिल्ह्याबाहेरील २८३ असे एकूण ४८ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ०३ हजार ९९४ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.०६ टक्के, नाशिक शहरात ८३.९५ टक्के, मालेगाव मध्ये ८१.३८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.७८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार ४९६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४८२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३६ व जिल्हा बाहेरील ९७ अशा एकूण ३ हजार ३११ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️३ लाख ०३ हजार ९९४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ५२ हजार ११२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४८ हजार ५७१ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)