पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*
*जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ४७ हजार ३४३ रुग्ण कोरोनामुक्त*
*सद्यस्थितीत ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार ३४३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६२९, चांदवड १ हजार ७७५, सिन्नर १ हजार ८२२, दिंडोरी १ हजार ६०६, निफाड ३ हजार ५१३, देवळा १ हजार ११०, नांदगांव ९२४, येवला ७०४, त्र्यंबकेश्वर ४५०, सुरगाणा ३८२, पेठ १९७, कळवण ८४७, बागलाण १ हजार ६९२, इगतपुरी ३७३, मालेगांव ग्रामीण ७३६ असे एकूण १७ हजार ७६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २८ हजार ०१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७१८ तर जिल्ह्याबाहेरील २१४ असे एकूण ४७ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३१९ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.४५ टक्के, नाशिक शहरात ८३.५९ टक्के, मालेगाव मध्ये ८२.२६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९१ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार ४७० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४७१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३५ व जिल्हा बाहेरील ९६ अशा एकूण ३ हजार २७२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️२ लाख ९८ हजार ३१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ४७ हजार ३४३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४७ हजार ७०४ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.९१ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)