पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता
उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७०७ ने घट
जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख १७ हजार ४५५ रुग्ण कोरोनामुक्त
सद्यस्थितीत ३७ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरू*
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख १७ हजार ४५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३७ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ७०७ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत २ हजार ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ३१६, चांदवड १ हजार ४१८, सिन्नर १ हजार ४८१, दिंडोरी १ हजार २१३, निफाड २ हजार ५९३, देवळा ९८४, नांदगांव ८६१, येवला ५९१, त्र्यंबकेश्वर ४२९, सुरगाणा ३०६, पेठ १४१, कळवण ५३९, बागलाण १ हजार २६९, इगतपुरी ४३५, मालेगांव ग्रामीण ७३१ असे एकूण १४ हजार ३०७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ३५५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७२ तर जिल्ह्याबाहेरील १३७ असे एकूण ३७ हजार ६७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ५८ हजार ०२१ रुग्ण आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८२.२० टक्के, नाशिक शहरात ८५.५४ टक्के, मालेगाव मध्ये ७९.५२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.५५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.२८ इतके आहे.
*मृत्यु :*
नाशिक ग्रामीण १ हजार २३८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३४०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२७ व जिल्हा बाहेरील ९० अशा एकूण २ हजार ८९५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
◼️२ लाख ५८ हजार ०२१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख १७ हजार ४५५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३७ हजार ६७१ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.२८ टक्के.
*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)