नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील महिलांना स्वरक्षणाकरता शस्त्र वापरण्याचे परवाने व बाळगण्याची परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन राज्यपालांच्या नावे काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये व गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रोज कुठे ना कुठे राज्यांमधील कुठल्यातरी मेट्रोसिटी सारख्या शहरात जिल्ह्यात ग्रामीण भागात रोज कुठून ना कुठून महिला अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमधील माता-भगिनी या भयभीत वातावरणामध्ये जगत आहे. अशा पद्धतीत त्यांना स्वतःचा आत्मविश्वास हरवल्यासारखं झालं असून म्हणून अशा परिस्थितीत राज्यातील सरकार हे महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यातील माता-भगिनींना स्वतःच्या रक्षणाकरता शस्त्र जवळ ठेवण्याचे परवानगी व वापरण्याचे परवाने देण्यात यावी.
हे निवेदन देतांना नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वातीताई जाधव, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, उद्धव पवार, धोंडीराम बोडके, संतोष (मुन्ना) ठाकूर, सिद्धार्थ गांगुर्डे, संदीप वाघ, उमेश चव्हाण, संतोष हिवाळे, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रा भालचंद्र पाटील, प्रा आदित्य नागरगोजे, अरुण जाधव, विनायक ठाकूर, अनिल आंबेकर, रणजीत परदेशी, हेमंत परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.