नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाने गांधीगिरी मार्गाने चार फूट दुर्बिणी मधून चला शोधूया स्मार्ट नाशिक हे आंदोलन पंचवटी निमाणी बस स्थानक येथे केले. नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. नाशिक शहरांमध्ये खड्ड्यांचा साम्राज्य झालं असून याकरता करोडो रुपये खर्च केले जात आहे. तरी नाशिक शहर हे खड्ड्यातच दिसून येत आहे हे पैसे जाता कुठे? एकीकडे स्वच्छता च्या नावावर करोडो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे स्वच्छ शहराच्या देशातील यादीच्या सर्वे मधील नाशिक शहर २३ व्या स्थानावर? आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली करोडो रुपयाची यांत्रिक झाडू महानगरपालिकेने घेतली ती धुळखात पडून? आहे. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये संपूर्ण नाशिक शहर वेठीस धरण्याचं काम का सुरू केलं? नमो गोदा प्रकल्पाच्या नावाने करोडो रुपये खर्च तरी कुठे प्रदूषण मुक्त गोदा? शहरात नॅनो मेट्रो सुरू झाली का? शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नलावता थेट गोदावरी नदीपात्रामध्ये सोडल्या जाते? शहरातील वीज तारा भूमिगत करण्याच्या नावाखाली अनेक वर्षापासून काम सुरू परंतु परिस्थिती जैसे थे? स्मार्ट सिटी कडून नाशिक महानगरपालिकेचे सांस्कृतिक नाट्यगृह सुधारण्याच्या नावाखाली अनेक वर्षापासून बंद स्थितीत? नाशिक महानगरपालिकेचे नामवंत उद्यान अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेले? असे प्रश्न करत हे आंदोलन केले.
अशा अनेक समस्या नाशिक शहरवासीयांना पडले असून याकरताच नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या या गांधीगिरी मार्गाने केलेल्या आंदोलनाचा नेतृत्व नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केले. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहून दिवे, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, संतोष जाधव माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, नाशिक शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती जाधव, संदीप शर्मा, भालचंद्र पाटील, सिद्धार्थ गांगुर्डे संदीप वाघ, संतोष शेवाळे, पोपटराव नागपुरे, अरुण दोंदे, अनिल बहोत, ज्ञानेश्वर चव्हाण, गौरव सोनार, अल्तमस शेख, संतोष हिवाळे, दत्ता कासार, उमेश चव्हाण, वंदनाताई पाटील, राजकुमार जेफ, जयेश पोकळे, अण्णा मोरे, गुड्डी खान, जगदीश वर्मा, फारुख मन्सुरी, उमेश दासवानी, रामदास लोखंडे, शहबाज मिर्झा, लहू जाधव राजीव घोलप आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.