नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात भर दिवसा पार्किंगमध्ये विद्यार्थिनींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या विद्यार्थिनींनी एकमेकीचे केस ओढून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात तुफान व्हायरल झाला आहे. याची दखल तत्काळ सरकारवाडा पोलिसांनी घेतली आहे. संबंधित विद्यार्थिनी या अल्पवयीन आहेत. त्यांच्यासह त्यांच्या पालकांना तत्काळ पोलिस स्टेशनमध्ये पाचारण करण्यात आले. या विद्यार्थिनींनी समज देण्यात आली आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
बघा हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1593578606227513345?s=20&t=tjxQemTI2iQDgUV1h11PFw
Nashik College Girl Fighting Video Viral