नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडल्याची माहिती तहसीलदार संदिप भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या ठिकाणाला भेट दिली असून तेथे राहणाऱ्या रहिवाश्यांशी चर्चा करून त्यांचे तात्काळ स्थलांतर करून त्यांना दिलासा दिला आहे.
घोटविहिरा व उंबरमाळ गावाला लागून असलेल्या दरीच्या खालच्या भागात माती ढासळल्याने रस्त्याला तडे जाणे व झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्याने त्या भागात वास्तव्यास असलेल्या दहा कुटुंबांचे घोटविहिरा गावातील रिकामी घरे, समाज मंदिरात व खरपडी आश्रमशाळेत स्थलांतर करताना त्यांची भोजनाची व्यवस्था करून तेथील नागरिकांना व कुटुंबियांना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यशी संवाद साधून दिलासा दिला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिप आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वारूळे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व गावातील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
Nashik Collector Remote area Visit Family Rehabilitation