नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलांनी पतीच्या दिर्घ आयुष्यासाठीच नव्हे तर कुटुंबासाठी नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी असलेले वडाचे वॄक्ष रोपण करत वटपौर्णिमा साजरी केली. नाशिक जिल्हा कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या उपाध्यक्षा अर्चना देवरे यांच्या वटपौर्णिमा आणि पर्यावरण संवर्धन या संकल्पनेस सर्व महिलांनी प्रोत्साहन देत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रसंगी त्यांनी कोरोना काळात अनुभवलेले क्षण आठवत, ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन फिरण्याची वेळ कुठल्याही नव-यावर किंवा कुंटूबावर येवू नये, म्हणून पर्यावरण संवर्धन जपणे अत्यंत गरजेचे असल्याचे सर्वांना सांगितले.
वडाची झाडे लावून पर्यावरण संवर्धन जपणा-या आणि कुटूंब व नोकरी सांभाळून, पुरुषांच्या खांद्याला खांदा देत झटणाऱ्या आजच्या या आधुनिक सावित्रींनी केलेल्या वटपौर्णिमेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या उपक्रमास नाशिक जिल्हा कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी वंदना महाले, रेखा काळे, प्रियंका मोहिते, पुनम नेरकर, मजुंषा साळुंखे, जयश्री टोपले, अश्विनी शिरसाठ, मिना पठाडे ,अरूण तांबे, भाऊसाहेब ढेबे, ज्ञानेश्वर ढिकले उपस्थित होते.
ट्रेंड ब्रेक केला
रूढी व परंपरा जपण्यासाठी आजकाल नोकरदार महिलांना सगळेच इन्स्टंट हवे असल्याच्या नादात वडाची फांदी विकत आणून किंवा तोडून तीलाच वडाचे झाड म्हणून पूजण्याचे फॅड आलेले आहे. एका दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या सारख्या शहरी भागात तर कित्येक लाख फांद्या कापल्या जातात. यामुळेच पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. हाच ट्रेंड ब्रेक करत आम्ही वडाचे वॄक्षारोपण केल्याचे यावेळी या महिलांनी सांगितले.