शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अशी फिरली चक्रे; कोविड बाधित बालकांना मोठा दिलासा

फेब्रुवारी 22, 2022 | 4:44 pm
in स्थानिक बातम्या
0
suraj mandhare e1708949872195

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला आहे. एका नव्या अभियानाअंतर्गत अधिकारीच या अनाथ बालकांची जबाबदारी स्विकारत आहेत. सरकारच्या विविध योजनांचा लाभ या बालकांना मिळावा यासाठी हे सर्व अधिकारी या बालकांचे जणू पालकत्वच निभावत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीही स्वतः एका बालकाची जबाबदारी स्विकारली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की,  कोरोना मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांनी एक मुखाने स्वीकारली. त्याचाच एक भाग म्हणून मी जबाबदारी स्वीकारलेल्या दोन बालिका कावेरी व प्राजक्ता साबळे यांना आज भेटलो. श्री व सौ साबळे यांना 21 वर्षानंतर झालेल्या या मुली केवळ पहिल्या वाढदिवसानंतर त्यांच्या पालकांना पारख्या झाल्या. आज त्यांचा सांभाळ त्यांचे मामा श्री घुले करीत आहेत. कोरोना नंतर पालक अथवा जोडीदार गमावलेल्या व्यक्तींसाठी मिशन वात्सल्य ही योजना सुरू झाली व आपल्या जिल्ह्यात आपण एका कार्डवर सर्व लाभ देण्याचा उपक्रम सुरू केला. त्याचा चांगला परिणाम मला या भेटीत दिसून आला. या बालिकांना शासनाकडून मिळालेले मुदत ठेवीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे, त्यांच्या सांभाळ करणाऱ्या मामांचा दाखला प्राप्त झालेला आहे, त्यांच्या वडिलांच्या मिळकतीवर अज्ञान पालन कर्ता म्हणून नाव देखील दाखल झालेले आहे. आता त्यांना शासकीय संगोपन शुल्क दरमहा मिळवून देणे, त्यांचे छोटे-मोठे वैद्यकीय उपचार शासकीय व्यवस्थेतून करून देणे, त्यांच्या आजीची संजय निराधार योजनेची पेन्शन मंजूर करून देणे अशा स्वरूपाचे उर्वरित लाभ एखादे दोन आठवड्यांमध्ये त्यांना निश्चितपणे दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला एक वरिष्ठ महसूल अधिकारी या माध्यमातून जोडला गेल्यामुळे त्या अधिकाऱ्याच्या पाठपुराव्यामुळे निश्चितपणे सर्व कामे गतीने पूर्ण होतील. त्याचबरोबर जे नातेवाईक या बालकांचा सांभाळ करीत आहेत त्यांच्यासोबत प्रशासन आहे ही भावना दृढ होऊन ते अधिक चांगल्या प्रकारे त्या बालकांचे संगोपन करतील याची मला खात्री वाटते, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सटाणा
बागलाण तहसिलदारांनी सांगितले की, तालुक्यातील नामपूर या गावात कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकाला भेट दिली. भेटीदरम्यान कुटुंबाची पार्श्वभूमी जाणून घेतली तेव्हा असे समजले की ते एकूण चार भावंडं आहेत. दोन बहिणी व दोन भाऊ. त्यापैकी मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असून इतर तिघे सध्या तिच्यासोबत नामपूर ता बागलाण येथे भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यापैकी इतर तिघा भावंडांचे वय 22,20,16 वर्षे असे आहे.यावेळी सर्वांशी चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांना महसूल विभागाच्या व महिला बालविकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. 16 वर्षे वय असलेल्या बालकाला (प्रतिक) महसूल विभागाच्या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, अनाथ बालकाला शिधापत्रिकेचा लाभ या योजना जागेवरच मंजुर करण्यात आल्या तर महिला बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेची माहिती देऊन कागदपत्राची अपूर्तता पूर्ण करण्यास मदत करून अनाथ बालकासाठी असणाऱ्या राज्य शासन 5 लक्ष सानुग्रह अनुदान योजना व P M cares for children योजनेंर्गत 10 लक्ष अर्थ सहाय्य इत्यादीचा लाभ सदर 18 वर्षाच्या आतील बालकास लवकरात लवकर मिळेल असे प्रयत्न केले. तसेच या बालकास महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, याचा या बालकाला भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रतीक सध्या दहावीला असून येत्या एक ते दीड महिन्यात त्याची परीक्षा आहे. त्यासाठी त्याला नामपूर येथे एका स्टडी हॉल ला सुद्धा ऍडमिशन घेऊन देण्यात आलेले आहे, असे तहसिलदारांनी सांगितले आहे.

22 वर्षीय बहिणीची (कोमल) देखिल दखल घेण्यात आली असून तिचे शिक्षण संगणक शास्त्रातून वोकेशनल ट्रेनिंग झालेले असून तिला संगणक शाखेतून डिप्लोमा करायचा आहे व तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्यासाठी तिला मदत तालुका महसूल कर्मचारी संघटनेमार्फत स्पर्धा परीक्षा विशेष आवश्यक असणारी पुस्तके भेट म्हणून दिली . तसेच तिच्या मनमाड येथील कॉलेजची तृतीय व चतुर्थ वर्षाची फी भरण्यासाठी तालुका महसूल संघटनेमार्फत तरतूद करण्यात आली. 20 वर्षाचा एक भाऊ आहे, त्याचे शिक्षण 12 वी (कला शाखेतून) झाले आहे. त्याच्यासाठी देखील ITI संदर्भात ITI सटाणा येथिल principal सोबत बोलणे झाले आहे. शालेय वर्ष जरी दोन पासून सुरू होणार असले तरी सध्या दोन-तीन महिन्यात काही जुजबी कौशल्य विषयक शिक्षण देण्याविषयी विनंती केलेली आहे व त्यास सटाणा येथील आयटीआय प्रिन्सिपल यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे.येत्या आठवड्यात त्याच्या प्रशिक्षणास सुरुवात होईल.
लग्न झालेल्या बहिणीला देखील भविष्यात नामपूर या ठिकाणी महिला व बालविकास विभागामार्फत ब्युटी पार्लर, शिवणकाम , इमिटेशन ज्वेलरी, दुग्धजन्य पदार्थांचे प्रशिक्षण इ. प्रकारचे प्रशिक्षण साठी नाव नोंदणी केलेली आहे.यामुळे त्यांना भविष्यात उदरनिर्वाहाचे एक साधन उपलब्ध होऊ शकते. कुटुंब मूळचे चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील आहे. तीनही भावंडांचे जातीचे प्रमाणपत्र काढणेसाठी आजच सेतुमार्फत फॉर्म भरला असून या आठवड्यात तीनही भावंडांना जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रेमेलयेर प्रमाणपत्र मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे, असे तहसिलदारांनी स्पष्ट केले.

चांदवड
तहसिलदारांनी सांगितले की, कोविड मध्ये अनाथ झालेल्या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन आधार देण्यासाठी शासकीय मदत दूत म्हणून जी मौजे बहादुरी तालुका चांदवड येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील या अनाथ बालकास त्याचे घरी जाऊन भेट घेतली व त्याच्या समस्या जाणून घेतल्या
1)5 लाख मुदत ठेव बाबत प्रस्ताव सादर आहे
2)10 लाख pmcare portal ला म जिल्हाधिकारी यांनी approval देऊन प्रस्ताव सादर आहे
3)शेतीवर वारस नोंद घेण्यात आली आहे
4) वडिलांचे जागेवर ग्राम पंचायत येथे कर्मचारी म्हणून कामावर घेतले आहे व कायम करण्याबाबत ग्रामसेवक व BDO यांना सूचना दिल्या
5)कर्तव्यावर असताना कोविड मध्ये मृत्यू झाल्यामुळे 50 लाख सानुग्रह अनुदान प्रस्ताव सादर आहे
6) रमाई घरकुल लाभ प्राप्त आहे ग्रामसेवक यांना वारस नोंद करण्यास सूचना दिली
तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याची तजवीज ठेवली आहे

कळवण
तहसिलदारांनी सांगितले की, मिताशा साहेबराव पवार (रा. नवी बेज) या अनाथ बालकाच्या घरी आज भेट दिली .समवेत बालविकास प्रकल्प अधिकारी ,तलाठी मंडळ अधिकारी व पोलीस पाटील होते मिताशाला 5 लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र मिळाले आहे व बालसंगोपन योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे. तसेच इतर योजना चा लाभ देणे बाबत तजवीज ठेवली आहे. कळवण येथील शरद पवार स्कुल 12 वी पर्यंत मोफत शिक्षण देण्यास तयार आहे. त्याबाबत पालकांशी चर्चा केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दहावी २०२२ परीक्षेचं स्वागत का आणि कसं करावं? (बघा व्हिडिओ)

Next Post

मनोरंजनाचा आठवडा! या सप्ताहात तुमच्या भेटीला येणार या वेब मालिका आणि चित्रपट

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मनोरंजनाचा आठवडा! या सप्ताहात तुमच्या भेटीला येणार या वेब मालिका आणि चित्रपट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011