मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाने मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले होते.
त्यानंतर नाशिक जिल्हाधिकारी आज एक आदेश काढला आहे. त्यात त्यांनी सोमवार १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करुन बुधवार दिनांक १८ सप्टेंबर, २०२४रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबधित जिल्हाधिका-यांनी निर्णय घ्यावा असे राज्य शासनाने म्हटले होते.
नाशिक जिल्हयात बहुतांश मुस्लिम बांधव दिनांक १६/०९/२०२४ रोजी ईद-ए-मिलाद सण व जुलुस साजरा करणार आहेत, त्यान्वये वार सोमवार, दि.१६/०९/२०२४ ची ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवण्यात येत आहे. बुधवार दिनांक १८/०९/२०२४ रोजी सर्व कार्यालय नेहमी प्रमाणे सुरु राहतील असे म्हटले आहे.