नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमधील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किरकोळ किंमतीत ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. तशी घोषणा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने केली आहे. सीएनजीच्या दरात ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. करांसहित ही वाढ चार रुपये आहे. त्यामुळे सीएनजी किरकोळ विक्री किंमत ९२.५०/- प्रति किलो वरून आता. ९६.५०/- प्रति किलो झाली आहे.
घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किंमत आता देशात ४९.५०/- प्रति एससीएम वरून रु. ५२.५०/- प्रति एससीएम एवढी झाली आहे. ही वाढ आज मध्यरात्रीपासून लागू झाली आहे याची एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नैसर्गिक वायूच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजी च्या दरात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजी क्षेत्रांमध्ये लागू असलेल्या घरगुती नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता भरून काढण्यासाठी री-गॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस (आर-एलएनजी) देखील मिसळणे आवश्यक आहे. वरील गोष्टींमुळे एम एन जी एल द्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या इनपुट खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. तथापि, एम एन जी एल ने या क्षणी वाढलेल्या गॅसच्या अगदी अल्प प्रमाणात ग्राहकांवर भार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेल्या वाढीनंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे ४४ टक्के आणि २० इतकी बचत होते आहे. नाशिकसारख्या शहरात ऑटों रिक्षा चालकांसाठी ही बचत २२ टक्के इतकी आहे. दरवाढीनंतरही एलएनजी यांच्या घरगुती वापराच्या पीएनजी सिलेंडरची किंमत ११ टक्क्यांनी कमी आहे.
Nashik CNG and PNG Rate Hike from today