नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आज तपोनवमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाशिबिर संपन्न होत आहे. नाशिक येथील सिटी बस लिंक डेपो शेजारील तपोवन मैदान येथे होणाऱ्या या महाशिबिरास जवळपास ५० हजार महिलांच्या उपस्थिती आहे. शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत/लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन केले आहे. या शिबिराच्या ठिकाणी लाभार्थींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे. बघा लाईव्ह….
https://twitter.com/i/broadcasts/1zqKVYgqobPxB