नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका पतीने पत्नीला प्रसुतीसाठी आणले. त्यानंतर डॉक्टरांना एक धक्कादायक बाब समजली. हा सर्व प्रकार डॉक्टरांनी पोलिसांना सांगितला. त्याची तत्काळ दखल घेत पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन असतांनाही तिला मातृत्व लादल्याप्रकरणी थेट पती विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या विवाहीतेच्या कागदपत्र पडताळणीत बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश मगरे (रा.शरणपूर) असे संशयित पतीचे नाव आहे. पीडिता अल्पवयीन असतांनाही तिचा गेल्या वर्षी संशयिताशी विवाह पार पडला. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्याने हा बालविवाहाचा प्रकार समोर आला आहे. विवाहानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला असून तिच्या कागदपत्र पडताळणीत अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने थेट पती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik Civil Hospital Women Delivery Husband Booked