नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजीव गांधी भवन परिसरात अनेक खासगी कंपन्यांचे कार्यालय आहेत. त्यात फायनान्स कंपन्यांची संख्या अधिक आहे. आणि अशाच एका खासगी फायनान्स कंपनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्यालयातील मॅनेजरने आपल्याच सहकारी महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार, मॅनेजरवर गुन्हा दाकल करण्यात आला आहे.
व्यवस्थापकाने सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीस फोटो दाखविण्याची धमकी देत संशयिताने पीडितेस मारहाण केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल कारभारी जाधव (रा. जेलरोड) असे संशयित व्यवस्थापकाचे नाव आहे. संशयित आणि पीडीता राजीव गांधी भवन परिसरातील एका फायनान्स कंपनीत कार्यरत आहेत. बुधवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास पीडिता नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करीत असतांना संशयिताने तिला गाठले. पीडिता विवाहीत असल्याचे माहित असूनही संशयिताने तुम्हाला करिअर कसे करायचे हे शिकवून देईल अशी बतावणी करीत महिलेचा विनयभंग केला.
यावेळी महिलेने त्यास खडसावण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने दोघांचा एकत्रीत फोटो पतीस दाखविण्याची धमकी देत तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.