अल्पवयीन मुलीचा विनयभंग एकास अटक
नाशिक – प्रेमास नकार दिल्याने एकाने कुटूंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीस बेदम मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना पंचवटीत घडली. पिडीतेच्या तक्रारीवरून पोलीसांनी संशयीतास अटक केली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो)कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल विनोद वाघेला (रा.मेरी कॉलनी,पंचवटी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार श्निवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुलगी एकटी असल्याची संधी साधून संशयिताने तिला गाठले. तू मला आवडते.माझ्याशी प्रेमसंबध ठेव असे म्हणून त्याने अंगलट केली. यावेळी मुलीने नकार देत आरडाओरड केली असता संशयीने शिवीगाळ करीत तसेच लाथाबुक्यांनी व कमरेच्या पट्याने मुलीला मारहाण करीत विनयभंग केला. तसेच संशयीताने तू माझी नाही तर कुणाची होवू देणार नाही असे म्हणत तुझ्या कुटूंबियांनाही जीवे ठेवणार नाही अशी धमकी देत पोबारा केला. पोलीसांनी संशयीतास हुडकून काढले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.
—
तरुणीसह महिलेची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून रविवारी (दि.११) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तरूणीसह एका महिलेने आत्महत्या केली. दोघीच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पुजा नामदेव गांगुर्डे (२४ रा.पंचशिल अपा.राम गार्डन जवळ) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. पुजा गांगुर्डे हिने दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तीचा मृत्यु झाला. याबाबत सुवर्णा मोरे यांनी खबर दिल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत. दुसरी घटना जुने नाशिक येथील बुधवार पेठेत घडली. दिपाली शिवाजी व्यवहारे (२३ रा.आसराची वेस,पाटील गल्ली) या महिलेने अज्ञात कारणातून आपल्या घराच्या तिसºया मजल्यावरील खोलीत मध्यरात्री छताच्या सुमारास लाकडी बल्लीस ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता.ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.