नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या काही भागात उद्या, बुधवार, २५ जानेवारी रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे. जलवाहिनीच्या गळतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे हा पाणी पुरवठा बाधित होणार आहे.
महापालिकेच्या पामी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सातपूर विभागात ५०० मीमी व्यासाच्या पीएससी ग्राव्हिटी मेन पाईपलाईन पाणी गळती दुरुस्ती आणि जीपीओ जलकुंभ येथे ४५० मी.मी. व्यासाचा व्हॉल बसविण्याचे काम होणार आहे. त्यासाठी बुधवारी दि २५/०१/२०२३ रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची सूचना आहे.
सातपुर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधील डावा तट कालवा , आनंदी आंगण जॉगिंग ट्रॅक पाईप लाईन रोड येथे ५०० मी मी व्यासाच्या पीएससी ग्राव्हिटी मेन पाईपलाईनला पाणी गळती सुरू झालेली आहे. सदरील पाईपलाईन ही शुद्ध पाण्याची आहे. त्यावरून सातपुर प्रभाग ८ व नाशिक पश्चिम मधील प्रभाग ७ रामराज्य , नहुष जलकुंभ भरून वितरण क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यात येतो. नाशिक पश्चिम विभागातील जी.पी.ओ. जलकुंभ बुधवार पेठ जलकुंभ व सादिकशहा जलकुंभ भरणाऱ्या लाईनवर ४५० मीमी व्यासाचा व्हॉल बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या जलकुंभावरुन नाशिक पश्चिम प्र.क्र . १३ ( भागशः ) व प्र . क्र १४ ( भागशः ) मध्ये पाणी वितरण होते.
सदरील ठिकाणी बुधवारी दि २५/०१/२०२३ रोजी सकाळचा पाणीपुरवठा झाल्यानंतर पाईपलाईन गळती दुरुस्ती करणे व व्हॉल बसविण्याचे काम करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शटडाऊन आवश्यक आहे. त्यामुळे खालील परिसरात बुधवार दि २५/०१/२०२३ रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि मनपास सहकार्य करावे ही विनंती आहे.
शटडाऊनमुळे बाधीत होणारा पाणीपुरवठा परिसर खालील प्रमाणे आहे. प्र . क्र . १३ प्र.क्र . १४ प्र.क्र . ८ रामराज्य जलकुभ- सावरकर नगर राम नगर नरसिंह नगर मते नर्सरी रोड, दाते नगर आसाराम बापू पूल परिसर व इत्यादी परिसर प्र.क्र . ७ नहुष जलकुंभ छुडी के नगर सहदेव नगर आयाचीत नगर, सुयोजित गार्डन, गंगा सागर कॉलनी, पंपिंग स्टेशन परिसर , चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिक नगर, शांतिनिकेतन कॉलनी १२ पंपिंग स्टेशन, चैतन्य नगर इत्यादी परिसर सिद्धिविनायक कॉलनी भद्रकाली , सामवार पेठ , चव्हाटा , बुधवार पेठ , बडी दर्गा परीसर , कुंभार वाडा जुने नाशिक परीसर , सारडा सर्कल परीसर , अमरधाम रोड