नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भात महत्त्वाचे वृत्त आहे. नाशिक महापालिकेने यासंदर्भात माहिती दिली आहे. येत्या शनिवारी, २९ एप्रिलला शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ केव्ही एचटी वीज पुरवठा घेण्यात आलेला आहे. सदर पंपींग स्टेशनद्वारे मनपाचे बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो.
महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाईनची दुरुस्ती व पावसाळा पूर्व कामे (सातपूर कॉलनी ते कार्बन नाका ते गंगापूर धरण पावेतो) करण्याकरीता तसेच मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड कार्यान्वित सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा आहे.
सदरचे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीस सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे करणे करीता वीजपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार दि. २९/०४/२०२३ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दि. ३०/०४/२०२३ रविवार रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
Nashik City Water Supply Stop NMC