नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) विभागाने आज एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, येत्या बुधवारी म्हणजेच २१ जून रोजी शहराच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक रोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंड मधील गोदावरी जलकुंभ भरणारी मुख्य उर्ध्ववाहीनी आहे. ६०० मी.मी. व्यासाच्या या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. सदर गळतीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळेच काही भागात एक दिवसाचा पाणी पुरवठा बंद करणे आवश्यक आहे.
या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर
प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.
प्रभाग क्र.19- गोरेवाडी, शास्त्री नगर
प्रभाग क्र.20- पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर,
बुधवार, २१ जून रोजी वरील प्रभागात सकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. सायंकाळचा कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याची येथील नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहान कार्यकारी अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा) नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.