नाशिक – शहराच्या काही भागात येत्या सोमवारी व मंगळवारी (१५ व १६ नोव्हेंबर) पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे. पंचवटी भागात असलेल्या हिरावाडीतील जलवाहिनीला सध्या गळती लागली आहे. त्याची दुरुस्ती तातडीने करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बाधित होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. शहराच्या कुठल्या भागात पाणी पुरवठा होणार नाही याची माहिती खालीलप्रमाणे