नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. महावितरण कंपनी मार्फत ३३ केव्ही एक्सप्रेस फिडरचे लाईन शिफ्टींग व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी (२४ एप्रिल) महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील वीज पुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत खंडित राहणार आहे. त्यामुळे नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा रविवार सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.