नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या काही भागात येत्या शुक्रवारी (11 फेब्रुवारी) पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील गुरुत्व वाहिनीवरील 900 मि.मि. व्हॉल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी शटडाऊन आवश्यक आहे. परिणामी गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जाणार आहे.
नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. 23 भागश: व 30 भागश: साईनाथ नगर, विनय नगर, अमृत वर्षा कॉलनी, वडाळा रोड, जयदीप नगर, मिल्लत नगर, जेएमसीटी कॉलेज परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रहनुमा नगर, गणेश बाबा नगर, आदित्य नगर, कल्पतरू नगर, पखाल रोड, मातोश्री कॉलनी, ममतानगर, अशोका मार्ग, इ. परिसर व संपुर्ण नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. 17, 18, 19, 20, 21 व 22 मधील पाणीपुरवठा शुक्रवार दि. 11/02/2022 रोजीचा सकाळी 09:00 वाजेनंतर व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. शनिवार दि. 12/02/2022 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.