नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या. याप्रकरणी आडगाव आणि पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना गोदाघाटावरील गौरी पटांगण भागात घडली. नरेंद्र आनंदा जाधव (रा.काझीगल्ली, कुंभारवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव बुधवारी (दि.७) सायंकाळी गोदाघाटावर गेले होते. गौरी पटांगणावरील रेती डेपो परिसरात त्यांनी आपली एमएच १५ एटी ९५३८ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
दुस-या घटनेत पंचवटीतील अनिल सुरेशराव देशमुख (रा. आकांक्षा अपार्टमेंट, चव्हाणनगर) यांची पॅशन प्रो एमएच १५ एफसी ७७१५ दुचाकी गेल्या रविवारी (दि.४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.