बिटको चौकात सात लाखांची लूट
नाशिक – पुणे महामार्गावरील वर्दळीच्या बिटको चौकात वीज भवन कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ भर दुपारी एकाला सात लाखाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला. अकुश प्रकाश शिरसाठ (वय ३७, शिवनेरी बंगला, संभाजी नगर पारेगाव रोड येवला) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी सोमवारी (ता.२७) दुपारी पावणे चारच्या सुमारास अकुंश शिरसाठ यांना चौघा अज्ञात भामट्यांनी वीज भवनच्या प्रवेशद्वाराजवळ गाठून हॉकी स्टीक व लोखंडी गज आणि बॅटने बेदम मारहाण करीत, त्यांच्या गळ्यातील ७ तोळ्याची सोन्याची चेन तसेच बॅगेतील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड असा सुमारे ७ लाख १० हजाराचा ऐवज लूटून नेला. पाळत ठेउन हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र लुटारुचा तपास लागलेली नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर तपास करीत आहेत.
शहरातून सहा दुचाकी लांबवल्या
नाशिक – शहरात दुचाकी चोराचा उच्छाद सुरु असून वेगवेगळ्या भागात सहा दुचाकी चोरीचे गुन्हे बुधवारी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. गंगापूर रोड येथील दिनेश प्रभाकर अमृतकर (वय ४६, रघुनंदन पार्क, चैतन्यनगर, सावरकरनगर) यांची चैतन्यनगर येथील गोंदवलेकर महाराज मंदीराजवळ लावलेली दुचाकी होंडा शाईन (एमएच १५ डीपी ८४२६) दुचाकी शनिवारी (ता.२५) रात्रीतून चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत शकील बरकत अली (वय ३१, सनडेअरी वडाळारोड) यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली ॲक्सेस सुझूकी (एमएच १५ जीयु ४२३४) हि बुधवारी (ता.२९) रात्रीतून चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत अर्चना राजेंद्र धात्रक (वय ४७, कैलासनगर लोहकरे मळा औरंगाबाद रोड) यांची होंडा ॲक्टीव्हा १६ मार्चला त्यांच्या लोहकरे मळा येथील कैलास नगर येथील मळ्यातून चोरुन नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चौथी घटना वडाळा पाथर्डी रोड भागात उघडकीस आली. जुबेर शफी शेख (वय ३२, अमृतवर्षा कॉलनी, साईनाथनगर वडाळा – पाथर्डी रोड) यांची लाल रंगाची दुचाकी (एमएच १५ एफएल ७२५९) हि दुचाकी साई लॉन्स परिसरातील पार्किंगमधून चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पाचव्या घटनेत साहेबराव रामराव चव्हाण (वय ४५, दत्तविहार सोसायटी मानूर रोड स्वराज ट्रॅक्टर हाउसमागे)यांची दुचाकी होंडा ॲक्टीव्हा (एमएच १५ जीएस ४३२४) हि दुचाकी ८ सप्टेंबरला रात्रीतून कधी तरी पखालरोड सुरभी पार्क सोसायटीच्या पार्किंगमधून चोरुन नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार राजु टेमगर तपास करीत आहे. सहाव्या घटनेत अंबडगाव परिसरात बारक्या मोचडा पावरा (वय ३०,स्वामीनगर, अंबड गाव) यांनी त्यांची दुचाकी शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी सहाला दुकानासमोर लावलेली हिरो होंडा डिलक्स (एमएच ३९ एएफ ५ ४७३) चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रस्त्याने जाणाऱ्या महिलेची पर्स चोरली
नाशिक – इंदिरानगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी रस्त्याने चाललेल्या महिलेच्या हातातील पर्स ओरबाडून नेली. बुधवारी सायंकाळी पावने सातच्या सुमारास पाथर्डी रस्त्यावरील आरआरपी कॅफेजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेली माहीती अशी वर्षा भिमराव पवार (वय ५०, श्री रवि अपार्टमेंट सदाशिवनगर) या पाथर्डी गाव रस्त्यावरुन पायी जात असतांना सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पल्सर दुचाकी (एमएच १५ एफझेड ४३६) दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी महिलेच्या हातातील पर्स हिसकावून ओरबडून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
घरात घुसून मोबाईल लांबवला
नाशिक – देवळाली गावात नाशिक रोडला तोफखाना मार्गावरील स्वामी बिल्डींग मध्ये घरात घुसून एकाने चार्जींगला लावलेला मोबाईल चोरुन नेला. कल्पना सुनील चांडक (वय ५५, स्वामी बिल्डींग) असे पिडीतीचे नाव आहे. बुधवार (ता.२९) आठच्या सुमारास कल्पना चांडक यांनी त्यांच्या घरात त्यांचा सॅमसग कंपनी एम ३० मोबाईल चार्जींगला लावलेला असतांना एका अनोळखी व्यक्तीने घरात बळजबरीने प्रवेश करीत त्यांना मारहाण करीत, धक्का देउन खाली पाडून त्यांनी चार्जींगला लावलेला मोबाईल जबरदस्तीने ओढून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक विकास लोंढे तपास करीत आहेत.