शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्या
नाशिक – शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसात वेगवेगळ््या भागात राहणाºया तिघांनी आत्महत्या केली. त्यात एका वृध्दाचा समावेश आहे. संबधीतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सातपूर लिंकरोड भागातील संतोष केशव सुर्यवंशी (४० रा.माऊली रो हाऊस,आशिर्वादनगर) यांनी सोमवारी (दि.२७) रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होेते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियानी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील अंबड वजन काटा भागात घडली. वाल्मिक आहिरे (६० रा. रा.वैष्णवी गार्डन) या वृध्दाने मंगळवारी (दि.२८) आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी शेजारी शैलेंद्र हिरे यांनी खबर दिली असून दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अधिक तपास जमादार शेळके आणि हवालदार टोपले करीत आहेत.
एकनाथ लक्ष्मण गायधनी (४३ रा.जाधव संकुल,पळसे ता.जि.नाशिक) यांनी मंगळवारी (दि.२८) घराजवळील कांद्याच्या चाळीत अज्ञात कारणातून लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्याना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.
जुना सायखेडा रोडवर महिलेची पोत खेचली
नाशिक – गिरणीतून दळण दळून घराकडे परतणाºया महिलेच्या गळ््यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना जुना सायखेडा रोड भागातील पार्वताबाई नगर येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पना धर्मेंद्र मोरे (५४ रा.पिंण्टो कॉलनी,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोरे या मंगळवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास परिसरातील गिरणीवर दळण दळण्यासाठी गेल्या होत्या. डोक्यावर पिठाचा डबा घेवून त्या नारायण बापू नगर मार्गाने जुना सायखेडा रोडच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. पार्वताबाई नगर येथील गजानन स्पर्श बिल्डींग समोर पाठीमागून काळ््या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे २० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून पार्वताबाई गार्डनच्या दिशेने पोबारा केला. या घटनेत मोरे या जमिनीवर पडल्याने त्यांना मोठी दुखापत झाली असून,अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
हॉटेल फोडून चोरी
नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल फोडून चोरट्यांनी गल्यातील रोकडसह दोन लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना के.के.वाघ महाविद्यालय परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
राहिल सलीम राजवाणी (रा.माहेश्वरी सोसा.गंजमाळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राजवाणी यांचे महामार्गावरील सागर गार्डन सोसायटीत फ्रेंडशिप नावाचे हॉटेल आहे. सोमवारी (दि.२७) रात्री अज्ञात चोरट््यांनी मुख्य दरवाजाच्या लाकडी फळ््या तोडून ही चोरी केली. हॉटेल मध्ये शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील तीन हजार रूपयांची रोकड,दोन लॅपटॉप,एक मोबाईल व डिव्हीआर असा सुमारे ४० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार थेटे करीत आहेत.
विहीतगावला कोयत्याने हल्ला
नाशिक – किरकोळ कारणातून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना विहीतगाव येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी हल्लेखोरास जेरबंद केले आहे.
रितीक शशिकांत शिरसाठ (२० रा.बागुल नगर,विहीतगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी अनिस शफिक शेख (४५ रा.बागुलनगर,विहीतगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख सोमवारी (दि.२७) रात्री परिसरातील शफिला शेख यांच्या किराणा दुकानासमोरून पायी आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून येणाºया संशयीताने शेख यांच्याकडे रागाने बघितल्याने त्यांनी जाब विचारला असता ही संतप्त संशयीताने त्यांना दगड फेकून मारला. या घटनेत शेख जमिनीवर पडले असता त्याने कमरेला लावलेला कोयता काढून शेख यांच्यावर सपासप वार केले. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
आंब्याची पाने तोडायला चढला अन तोल गेल्याने मृत्यू
नाशिक – पुजेसाठी भिंतीवर उभे राहून आंब्याची पाने तोडत असतांना पडल्याने एकाचा मृत्यु झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सिताराम आत्माराम आहिरे (५८ रा.माळी कॉलनी,श्रमिकनगर) असे पडल्याने मृत्यु झालेल्या इसमाचे नाव आहे. आहिरे मंगळवारी (दि.२८) देवपुजा करण्यासाठी घराजवळील आंब्याची पाने तोडत असतांना ही घटना घडली. संरक्षण भिंतीवर उभे राहून झाडाची पाने तोडत असतांना अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत त्यांच्या छातीस आणि डोक्यास वर्मी मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ देवगावकर हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक सुर्यवंशी करीत आहेत.